चोपडा तालुक्यातील घटना
चोपडा (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय मुलीला हातेड खुर्द येथील प्रमोद सुनील शिरसाठ या युवकाने आमिष दाखवत पळवून नेल्याची घटना दि. ८ रोजी घडली. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसांनी युवकाला ताब्यात घेतले आहे.
प्रमोद सुनील शिरसाठ (वय २५) याने ८ रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास आमिष दाखवून मुलीच्या राहत्या घराजवळून पळवून नेले. दि. ९ रोजी स्वतः प्रमोदने तिला अमळनेर पोलीस ठाण्यात सोडले. त्यानंतर अमळनेर पोलिसांनी चोपडा ग्रामीण पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर चोपडा पोलिसांनी अल्पवयीन मुलीला पालकांच्या ताब्यात दिले.
या प्रकरणी पोलिसांनी प्रमोदला अटक केली आहे. तर मुलीच्या वडलांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात प्रमोद शिरसाठ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.नि. कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनात पो.हे.कॉ. गणेश पाटील तपास करत आहेत.