चोपडा ( प्रतिनिधी ) – आंदोलन करत संसाराचे गाडे कसे हाकायचे ? या विवेचनेत काहीं एस टी कर्मचाऱ्याना आजारांनी घेरले आहे अनेक वाहक – चालक वेगवेगळ्या कामाचा शोधात दिसत आहेत कोणी शेतात तर कोणी गावाकडच्या यात्रेत व्यवसाय थाटून पोट भरत आहेत . चोपडा आगारातील वाहक वेळोदे येथील खंडेराव महाराजच्या यात्रेत शेंगदाणे – फुटाणे विकुन उपजीविका सुरू ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही दिसून आले आहे
एस. टी. महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी चोपडा आगाराचे कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. राज्य शासन जनतेची व कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत आहे पगारवाढ कोणती आणि कशी केली? याचे स्पष्टीकरण दयावे एसटीचे विलीनीकरण झाल्याशिवाय आम्ही संप मागे घेणार नाही भूमिकेवर आम्ही ठाम राहू असे कर्मचाऱ्यांनी एकजुटीच्या घोषणा देत सांगितले राज्य शासनाने अनेक कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
बजावल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे सरकार कर्मचाऱ्यांमध्ये फूट पाडण्यासाठी प्रयत्न करत आहे परंतु आम्ही कर्मचाऱ्यामध्ये फूट पडु देणार नाही असेही कर्मचाऱ्यांनी सांगितले.
एसटी कर्मचाऱ्यांमध्ये राज्य शासनाने वेगवेगळ्या पध्दतीने फूट पाडण्यासाठी प्रयत्न केले आहेत तरीही संपाचा तिढा मिटत नाही त्यामुळे राज्य शासनाने पगारवाढ करूनदेखील एसटीचे चाके फिरत नसल्याने अनेकांचा संसार उघड्यावर येतांना दिसत आहे