वडती ता. चोपडा (प्रतिनिधी) – चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळालेल्या गुप्त माहीती वरून एक संशयीत व्यक्ती चोपडा शिवारातील हतनूर पाटचारी जवळ चोरीची मोटार सायकल घेवून फिरत असल्याचे समजले.
त्याकरीता पुढील कारवाई करीता पोलिस कर्मचा-यांना सदर ठिकाणी पाठवले असता. संशयीत सुऱेश राजाराम बारेला ( वय 20) रा. देवली दुगानी ता. शेंधवा जि. बडवाणी (म.प्र.) त्यांच्या जवळ हिरो होंडा कंपनींची मोटार सायकल मिळून आल्याने त्याला चौकशी करीता ताब्यात घेतले असता त्याच्याकडून 125000/₹ किंमतीच्या एकूण तीन मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या.
आरोपीस अटक करून सी.आर. पी.सी 41 (1) (ड) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाई पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे , अपर पोलिस अधिक्षक सचिन गोरे व सहा. पोलिस अधिक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली व पोल्स निरिक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पो.हे.कॉ.सुनिल पाटील , पो ना. संतोष पारधी , पो. ना. ज्ञानेश्वर जवागे , पो.ना. जयदिप राजपूत, पो.कॉ. रविन्द्र पाटील यांनी केले.