चोपड्यातील घटनेत आरोपीला फाशी देण्याची मागणी
चोपडा (प्रतिनिधी) : तालुक्यातील विरवाडे-मालापूर रस्त्यावर शनिवारी घडलेल्या अमानुष कृत्याने संपूर्ण परिसर हादरून गेला. एका १३ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. ही घटना तिच्या लहान बहिणीने गावकऱ्यांना सांगितल्यानंतर उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी मुकेश पूना बारेला (वय २२) याला अटक केली आहे. याप्रकरणी समाजबांधवांनी पोलीस ठाण्यावर मूक मोर्चा काढून घटनेचा निषेध करून आरोपीला फाशी देण्याची मागणी केली.
चोपड्यातील एका गावात दि. ७ सप्टेंबर रोजी दुपारी ०४.०० ते ०५.०० वाजेच्या दरम्यान मयत मुलीसह तीन मुली याचेसह शेतात निदणी करुन घरी परत चालत येत असतांना संशयित मुकेश पुन्या बारेला (रा. मुळचा बलवाडी ता. वरला जि. बडवाणी (म.प्र), सध्या रा.पाटचारी जवळ चोपडा) याने त्यांचे मागोमाग येवुन बालिकेला पकडून जवळच असलेल्या शेतात नेवून तिचे कपडे काढून नग्न करुन तिच्यावर जबरदस्तीने दुष्कर्म करुन तिच्या डोक्यात दगड टाकुन तिला ठार मारले व तिचा मृतदेह कपाशीच्या शेतात फेकून दिल्या प्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर करत आहे
घटनेनंतर मारेकऱ्याने पळ काढला होता. मात्र, तातडीने घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. अखेर तो चोपडा- आडगाव रस्त्यावर पळून जात असताना पोलिसांच्या हाती लागला. जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधिकारी कविता नेरकर हे स्वतः घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पोलिसांना या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे निर्देश दिले. डॉ चंद्रकांत बारेला यांच्यासह समाजबांधवांनी मुक मोर्चा काढत अत्याचार पीडित बालिकेचे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी व आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशा मागणीचे निवेदन चोपडा शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक मधुकर सावळे यांना दिले.
दरम्यान, रविवारी सकाळी ११ वाजता हजारो महिला आश्रमाला लागून असलेल्या घाटावर आंघोळ करत असताना एक ११ वर्षीय मुलगा पूजेमध्ये असलेले पैसे उचलण्यासाठी आलं होता. अचानक हा मुलगा नदी काठावर गेला असताना पाय घसरून पडला व नदीमध्ये बुडू लागला. यावेळी महिलांनी आरडाओरडा केला. हे महिला पोलीस कॉन्स्टेबल पौर्णिमा चौधरी यांनी पाहिले. (केसीएन)त्यांनी मुलगा पाण्यात बुडत असल्याची खात्री पटताच क्षणाचाही विलंब न करता अंगावरील वर्दीवरच स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता पाण्यात उडी मारून त्याला बाहेर काढले. त्याचे प्राण वाचविले. या महिला कर्मचाऱ्याच्या धाडसाचे उपस्थित महिला भाविक, महर्षी कणवाश्रमाचे विश्वस्त तसेच सरपंच व सदस्यांमार्फत परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, जिल्हा पोलीस दलात नुकतीच नवीन कॉन्स्टेबल भरती झाली आहे. त्यातून नवनियुक्त महिला पोलीस कॉन्स्टेबल पौर्णिमा कैलास चौधरी यांनी मुलाचा जीव वाचवून वरिष्ठांच्या कौतुकास पात्र ठरल्या आहेत. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने सरपंच पुंडलिक सपकाळे यांनी त्यांचा सत्कार करून गौरव केला. यावेळी महर्षी कनवाश्रमाचे पूज्य अदैत्वानंदजी सरस्वती महाराज, पीएसआय गणेश सायकर, हेकॉ अनिल फेगडे, हेकॉ अनिल मोरे, सुनील पाटील, पोपट सोनार, कॉ. ज्योती साळुंखे, उपस्थित महिला व परिसरातील लोकांकडून महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.