एकावर गुन्हा ; चोपडा पोलिसांची कारवाई
चोपडा(प्रतिनिधी ) ;- चोपडा शहर पोलीसांनी शहरातील ८ रोजी पहाटे भोकरवाडा चौकामध्ये निर्दयीपणे वाहनात कोंबून बांधून ठेवलेल्या ४ गुरांची सुटका करण्यात आली आहे. पोलीसांनी वाहन जप्त केले असून याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष भगवान डांगर वय-२५, रा.आडगाव भोंबे ता. भोकरदन जि. जालना असे संशयित आरोपीचे नाव आहे.
चोपडा शहर पोलिसांना चोपडा शहरातील भोकरवाडा चौकामध्ये एका वाहनात गुरांना निर्दयीपणे बांधून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी ८ जुलै रोजी पहाटे ४ वाजता छापा टाकून या गुरांची सुटका करण्यात आली . तसेच वाहन क्रमांक (एमएच २० जीसी ८४४०) हे जप्त केले आहे. याप्रकरणी पोहेकॉ मदन पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहनचालक सुभाष भगवान डांगर वय-२५, रा. आडगाव भोंबे ता.भोकरदन जि. जळगाव जालना याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला . याप्रकरणी तपास पोलीस कॉन्स्टेबल संतोष पारधी करत आहे