अहिल्याबाई होळकर जयंती व त्रिशताब्दी सोहळ्यानिमित्त आयोजन
चाळीसगाव (प्रतिनिधी) – पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती व त्रिशताब्दी सोहळ्यानिमित्त बहाळ (कसबे) येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. अखंड हरिनाम सप्ताह आणि सांगता सोहळा २४ मे ते ३१ मे या कालावधीत हा सप्ताह संपन्न होत आहे.
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार सात दिवस कीर्तनाची सेवा देत आहेत. सप्ताहाची सांगता शनिवारी, दिनांक ३१ मे रोजी ह. भ. प. सहादू महाराज गंडे (बीड) यांच्या काल्याच्या कीर्तनाने होईल. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप केले जाईल. या कार्यक्रमाचे आयोजन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर समिती मंडळ, बहाळ (कसबे) यांनी केले असून, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. तसेच, स्वामी परमेश्वरानंद गिरीजी यांचे अनमोल मार्गदर्शन या सप्ताहास लाभले आहे.