जळगाव ( प्रतिनिधी ) ;- जळगाव कारागृहातील न्यायालयीन बंदी चिन्या उर्फ रवींद्र जगताप यांच्या मृत्यूप्रकरणी औरंगाबाद उच्च न्यायालयात तक्रार अर्ज दाखल करण्यात आली असून संबंधित दोन अधिकारी आणि दोन रक्षकांकडून दबाव आणि मानसिक त्रास होत असल्याची तक्रार धुळे कारागृह रक्षक अनिल सुरेश बुरकूल यांनी दाखल केली आहे .

तक्रार अर्जात म्हटले आहे कि , चिन्या उर्फ रवींद जगताप याचा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अमानुष मारहाण केली होती . यात त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी उच्च न्यायालयात १७०६/२० प्रमाणे याचिका दाखल करण्यात आली आहे. याबाबत कारागृहात घटनास्थळी कार्यरत तत्कालीन रक्षक मनोज जाधव यांनी चिन्या मृत्यू प्रकरणी जळगाव जिल्हा न्यायालयात जबाब दिला आहे. . प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मनोज जाधव याच्यावर घटनेशी निगडित अधिकारी व कर्मचारी यांचे मध्यस्थ व सरकारी रक्षक अनिल देवरे तसेच रक्षक हिवरकर हे याचिकाकर्ती महिला आणि जबाब देणारे रक्षक मनोज जाधव यांना भेटून अथवा फोनद्वारे धमकीवजा संदेश देत आहे. देवरे आणि हिवरकर हे स्थानिक असून त्यांचा पूर्व इतिहास हा अतिशय भयंकर असा आहे. वेळोवेळी हे त्रास देत असून घटना घडल्यापासून प्रकरण दडपणे राजकीय दबाव , पैशांचे अमिश , पुरावे नष्ट करणे आदी अनेक प्रकार करून याचिकाकर्त्यां व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मनोज जाधव यांच्यावर दडपण आणत आहे. याप्रकरणी पारदर्शक तपास व्हावा तसेच न्याय मिळावा संबंधितांना तात्काळ घटना स्थळावरून अन्य ठिकाणी प्रतिनियुक्तीने वर्ग करण्यात यावे याकरिता उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे .रक्षक अनिल देवरे हा अत्यंत सराईत अशा स्वरूपाचा कर्मचारी असुन कुख्यात गुन्हेगार व आतंकवादी पाकिस्तानी कैदी ए.सी.अब्दुल्ला यास पॅरोलवर बनावट पेपर व जामीनदार दिले प्रकरणी चौकशी नाशिक गुन्हे शाखेत प्रलंबित आहे.श्री.बुरकूल यांनी सदर तक्रारीची प्रत जळगाव मुख्य न्याय दंडाधिकारी ,विशेष पोलीस महानिरीक्षक, ( कारागृह ) अधीक्षक जिल्हा कारागृह जळगाव यांना मेल द्वारे पाठविलेली आले आहे .







