यावल ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील चिंचोली येथील २१ वर्षीय तरूणाने शेतातील झाडाला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली . यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ललीत वासूदेव कोळी (वय-२१) असे गळफास घेतलेल्या तरूणाचे नाव आहे.
ललीत कोळी हा आईवडील व भाऊ यांच्यासह चिंचोली ( ता. यावल ) येथे वास्तव्याला होता शेती करून ते उदरनिर्वाह करत होते . सोमवारी दुपारी गुरांना चारा टाकून येतो असे सांगून तो घरातून शेतात गेला होता ललीत रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला दरम्यान मयुर कोळी मंगळवारी ललीत कोळी यांच्या कासारखेडा शिवारातील शेतात गेले असतां लिंबाच्या झाडाला ललीत कोळी याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे दिसून आले. यावल पोलीसांना माहिती देण्यात आली, पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा केला व मृतदेह यावल ग्रामीण रूग्णालयात आणला. त्याने आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात आई मिराबाई, वडील वासूदेव कोळी, भाऊ पंकज आणि विवाहित बहिण असा परिवार आहे. पुढील तपास पो हे कॉ नरेंद्र बागुले करीत आहेत