• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

छत्तीसगड राज्यात लॉजमध्ये अपहरण करून डांबून ठेवलेल्या जळगावच्या तिघांची सुखरूप सुटका

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 5, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
छत्तीसगड राज्यात लॉजमध्ये अपहरण करून डांबून ठेवलेल्या जळगावच्या तिघांची सुखरूप सुटका

एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाची जबरदस्त कामगिरी

संशयित आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील एका व्यापाऱ्याच्या नातेवाईक व मित्रांना अपहरण करून छत्तीसगड जिल्ह्यात अज्ञात व्यक्तींनी घेऊन गेले असल्याप्रकरणी व खंडणी मागितल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी जबरदस्त कामगिरी केली असून तीनही अपहरण व्यक्तींची सुटका केली असून अपहरण करणाऱ्या चार जणांना छत्तीसगड जिल्ह्यातील एका लॉजमधून ताब्यात घेत अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्यावर खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सागर कमल लुल्ला (वय २४, रा. नवजीवन सोसायटी, भुसावळ) यांचे जळगाव शहरात शेअर मार्केटिंगचे सिंधी कॉलनी परिसरात दुकान आहे. त्यांचे नातेवाईक व मित्रांना अज्ञात व्यक्तींनी जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील साई सिटी येथून अपहरण करून अज्ञात व्यक्ती यांनी पळवून नेले होते. दरम्यान सदरहू अज्ञात व्यक्तींनी वेळोवेळी फिर्यादी व्यापारी सागर लुल्ला यांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना फोन करून सुरुवातीला २५ लाख नंतर ८ लाख रुपयांची खंडणी मागितली होती.

या प्रकरणी अपहरण करणाऱ्या संशयित आरोपींनी सुरुवातीला १ लाख २० हजार व नंतर ७० हजार असे १ लाख ९० हजार रुपये खंडणी म्हणून स्वीकारले होते. एमआयडीसी पोलीस स्टेशन समोर हे मोठे आव्हान उभे ठाकले होते. परप्रांतीय असूनही संशयित आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस पथकाने जीवाचे रान केले.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता अपहरण करणारी व्यक्ती अनोळखी असल्याने तसेच अपहरण झालेल्या व्यक्तींचे मोबाईल फोन बंद येत असताना देखील एमआयडीसी पोलिसांनी त्यांचे कौशल्य आणि तांत्रिक विश्लेषणाची मदत घेत अपहरण झालेल्या इसमांची माहिती काढली. हे सर्वजण छत्तीसगड येथे गेले असल्याचे समजल्याने त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी तपास सुरू केला. सदर घटनेतील तीन अपहरण झालेले व्यक्ती आणि अपहरण करणारे व्यक्ती हे छत्तीसगड येथील राजनांदगाव येथे असल्याची माहिती पथकाला मिळाली.

राजनांदगाव येथे १० ते १२ तास शोध घेतल्यानंतर तसेच हॉटेल व लॉजेस तपासल्यानंतर एका हॉटेलमध्ये सात व्यक्ती संशयितरित्या थांबून असल्याची माहिती मिळाली. तेथे जाऊन पाहणी केली असता अपहृत झालेले रोहित कैलास दर्डा, विशाल अनिल शुबवाणी, अजय ठाकरे हे दिसून आले. तसेच त्यांच्यासोबत त्यांचे अपहरण करणारे चार संशयित आरोपी देखील मिळून आले. अपहृत झालेल्या व्यक्तींना अपहरण करणाऱ्यांच्या ताब्यातून पोलिसांनी सुखरूप सोडवित अपहरण करणाऱ्यांना अटक केली.

अश्विनी हरीश कुमार माखीजा (वय ३६, रा. रायपूर, छत्तीसगड), संजय आरतमनी मिश्रा (रा. रसूलहा ता. थाडपट्टी जि. प्रतापगड उत्तर प्रदेश), दिलीप शेषनाथ मिश्रा (रा.रायपूर, छत्तीसगढ), आनंद श्रीतीर्थराज मिश्रा (रा. लखनऊ तेलीबाग, उत्तर प्रदेश)असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्यांच्यावर गंभीर खुनासारखे गुन्हे दाखल आहेत. एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी सर्वांना ताब्यात घेऊन जळगावात आणले. संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी संदीप गावित, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, पोलीस नाईक किशोर पाटील, योगेश बारी, पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील, किरण पाटील, चंदू पाटील, गणेश ठाकरे यांनी केलेली आहे. या धडक कामगिरीबद्दल एमआयडीसी पोलिसांचे कौतुक होत आहे.


Tags: #jalgaon crime news #maharahtra #bharathttps://kesariraj.com/chatisgad-rajyat-aapharan/
Previous Post

वादळी वाऱ्याने झोपडी पडून मजुराचा मृत्यू

Next Post

पर्यावरण दिनानिमित्त जैन इरिगेशनमध्ये पश्चिम आफ्रिकेतील पाहुण्यांच्याहस्ते वृक्षारोपण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पर्यावरण दिनानिमित्त जैन इरिगेशनमध्ये पश्चिम आफ्रिकेतील पाहुण्यांच्याहस्ते वृक्षारोपण

पर्यावरण दिनानिमित्त जैन इरिगेशनमध्ये पश्चिम आफ्रिकेतील पाहुण्यांच्याहस्ते वृक्षारोपण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !
1xbet russia

जलजीवन मिशन अंतर्गत जळगाव जिल्ह्यात ४३४ कामे पूर्ण

June 2, 2025
कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची गळफास लावून घेत आत्महत्या

June 2, 2025
गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवित व्यापाऱ्याला तब्बल ४८ लाख ५६ हजारांचा चुना
1xbet russia

कुटुंबीय मुलीकडे परदेशात, चोरटयांनी संधी साधून सव्वा लाखांचा ऐवज लांबविला !

June 2, 2025
महाराजस्व समाधान शिबिरात ३२० नागरिकांना थेट सेवा
1xbet russia

महाराजस्व समाधान शिबिरात ३२० नागरिकांना थेट सेवा

June 2, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !

जलजीवन मिशन अंतर्गत जळगाव जिल्ह्यात ४३४ कामे पूर्ण

June 2, 2025
कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची गळफास लावून घेत आत्महत्या

कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची गळफास लावून घेत आत्महत्या

June 2, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon