पाचोऱ्यातून ग्रामस्थांनी दिल्या सदिच्छा
पाचोरा (प्रतिनिधी) :- तालुक्यातील लोहारी बु. येथे शुक्रवारी दि. १ डिसेंबर रोजी चंडिका माता मूर्ती घेण्यासाठी पाचोरा येथून एक शिष्टमंडळ जयपूर, राजस्थानच्या दिशेने रवाना झाले आहे. या शिष्टमंडळला शिवसेनेच्या वैशाली सुर्यवंशी यांनी भेट व शुभेच्छा देऊन त्यांना सदिच्छा दिल्या.
शिष्टमंडळात संतोष पाटील, सतीश खैरनार, सुनील पाटील, किशोर पाटील, समाधान पाटील पोहरीकर, नितीन पाटील, धनराज पाटील, गोलू शशिकांत पाटील यांचा समावेश आहे. या प्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समस्त ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.