चाळीसगाव शहरकडील हद्दपार प्रस्ताव प्रमाणे गुन्हेगार जगदीश जगन्नाथ महाजन (वय ५१,टोळीप्रमुख), दादू उर्फ विशाल जगदीश महाजन (वय २३ दोघे रा. नेताजी पालकर चौक, चाळीसगाव) यांच्याविरुध्द चाळीसगाव पोलीस स्टेशनला खून, खुनाचा प्रयत्न, दंगल करणे, घातक हत्यार असे एकुण १० गुन्हे दाखल आहेत. या गुन्हेगारांनी सदरचे गुन्हे टोळीने केलेले आहेत. सदर हद्दपार प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी, चाळीसगाव उपविभाग यांनी केलेली आहे.
सदरचा हद्दपार प्रस्ताव हा चाळीसगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोहेको विनोद भोई, पोना/तुकाराम चव्हाण, महेंद्र पाटील अशांनी तयार करुन पोलीस अधीक्षक, जळगाव यांचे कडेस सादर केला होता. डॉ महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक यांनी प्रस्तावाचे चौकशीअंती गुन्हेगारांना ६ महिनेकरीता जळगाव जिल्हयांच्या हद्दीतुन हद्दपार आदेश पारित केलेले आहे. सदर हद्दपार प्रस्तावाचे कामकांज पो. निरी. किसन नजनपाटील, स्थानिक गुन्हे शाखा यांच्या अधिनस्त पोलीस अंमलदार सफौ यूनुस शेख इब्राहिम, पोहेको सुनिल पंडीत दामोदर यांनी पाहिले आहे.