चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – हरगीरबाबा नगरातील अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी उघडकीला आली पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चाळीसगाव शहरातील हरगीरबाबा नगर येथील लक्ष्मण संजय पवार (वय-१६) या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी २:३० वाजताच्या सुमारास उघडकीला आली या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. शहर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. लक्ष्मण पवारच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पो नि के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि दिपक बिरारी हे करीत आहेत.







