चाळीसगाव (प्रतिनिधी) – रद्दी दान सप्ताह अतंर्गत रद्दी पेपर संकलन करून तसेच शहरातील दात्यांच्या मदतीने वसुंधरा फाउंडेशनने दरवर्षाप्रमाणे शैक्षणिक साहित्य चाळीसगाव शहरातील 4 नगर पालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या 210 विद्यार्थ्यांसाठी आज तेथील शिक्षकांच्या स्वाधीन करण्यात आले.
शहरातील दाते तसेच कै देवेंद्रकुमार अहिरे सर यांचे परीवार आणि आनंदीबाई बंकट हायस्कुल वर्ग दहावी 96 बॅच यांनी या कामी योगदान दिले.यावेळी चित्रकार धर्मराज खैरनार यांनी या प्रकल्पाचे प्रमुख म्हणून प्रस्ताविक मांडले. कार्यक्रमाला बाबुलाल पवार गुरुजी, कांचनताई खरटमल, विजय शर्मा,खुशाल पाटील, गणेश खरटमल , भूषण ताथेड ,शैलेश जैन , भूषण कोठावदे, जगन्नाथ चिंचोले , रोटरी अध्यक्ष रोशन जैन , खेमचंद कुमावत , दीपक खैरनार उपस्थित होते. नगर परिषद मराठी शाळा क्र १ चे मुख्याध्यापक श्री निवृत्ती उंबरकर सर, शाळा क्र ४ चे मुख्याध्यापक ज्ञानेश साळुंखे सर, दिनेश पचलुरे सर , शाळा क्र १६ चे अविनाश साखरे सर तसेच शाळा क्र. ४ चे शिक्षक अनिल पेटे व शिक्षक वृंद यांनी कार्यक्रमाचे आयोजनाकरिता परिश्रम घेतले.
शहरातील सर्व दानशूर व्यक्तिमत्व, कै देवेंद्र अहिरे सर यांचे परिवार तसेच 1996 आ ब हायस्कूल बॅच यांचे वसुंधरा फाउंडेशन तर्फे मनापासून आभार मांनण्यात आले.