चाळीसगाव ;- आ. मंगेश चव्हाण यांची चाळीसगाव येथे जिल्हा शल्यचिकित्सक व प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत आज झालेल्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
बैठकीतील निर्णय
DPDC योजनेतून १३५ जम्बो सिलेंडर क्षमतेचा १ कोटी ३७ लाखांचा ऑक्सिजन प्लांटची उभारण्यात येणार, येत्या २ दिवसात प्रशासकीय मान्यता
जिल्हा प्रशासनाकडे आमदार मंगेश चव्हाण यांनी सातत्याने केलेल्या मागणीनुसार कोविड केअर सेंटरला ४ मेडिकल ऑफिसर, ४ स्टाफ नर्स, १० वार्डबॉय, २ डेटा एन्ट्री ऑपरेटर, १ एक्सरे टेक्निशियन अशी २१ नवीन तात्पुरती पद तात्काळ भरली जाणार
५ व्हेंटिलेटर पूर्ण क्षमतेने कार्यरत होऊन ऑक्सिजन बेड्सची संख्या ३८ वरून ७० इतकी वाढविण्यात येणार
आमदार निधीतून ग्रामीण रुग्णालयासाठी नवीन रक्त तपासणी मशीन, ऑक्सिजन Concentrator, Cell Counter, Bypape मशीन, एअर कंडिशनर, ICU बेडस, दोन बेडस मध्ये कर्टन्स, स्वछतेसाठी टाईल्स क्लिनर आदी नवीन मशिनरी उपलब्ध होणार
येत्या ८ दिवसात जास्तीत जास्त रेमडेसिविर इंजेक्शन चाळीसगाव तालुक्याला उपलब्ध होणार तसेच गरज वाटल्यास अजून ५० बेडस क्षमता तातडीने वाढविण्यासाठी सर्व साहित्य उपलब्ध