पोलीस अधिक्षकांचे आदेश
चाळीसगाव (प्रतिनिधी) – अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असणार्या चाळीसगाव येथील तुषार महेंद्र जाधव याच्यासह त्याच्या टोळीतील सदस्यांना हद्दपार करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी काढले आहे.
जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात एकत्र टोळी करून चोरी व लूटमार करणार्या गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याबाबत प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी मागविला होता. या अनुषंगाने चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी लूटमार करणार्या चार जणांवर एमपीडीए कारवाई अंतर्गत प्रस्ताव तयार केला होता. यातील भूपेश उर्फ भुर्या यशवंत सोनवणे (वय-२३), अभय उर्फ अभ्या हिम्मत लोहार (वय-१९), धनंजय उर्फ धन्या बाळासाहेब भोसले (वय-२५), आणि चोंग्या उर्फ तुषार महेंद्र जाधव (वय-२६) असे चौघांवर वेगवेगळ्या प्रकारचे चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात १८ गुन्हे दाखल आहेत.
या चौघांवरील हद्दपारचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांना पाठविला. या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक राजकुमार यांनी हद्दपार करण्याचा प्रस्तावाचे अवलोकन करून २ वर्षांकरिता चौघांना जिल्हा हद्दपारच्या प्रस्तावाला शनिवारी २३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता मंजुरी देण्यात आले आहे. यामुळे आता चारही जणांना दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. आजची हद्दपारीची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस नाईक विनोद भोई, तुकाराम चव्हाण, सत्तार सिंग माहेर, महिला पोलीस कॉन्स्टेबल शबा शेख, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार युनोसेक इब्राहिम पोलीस कॉन्स्टेबल सुनील पंडित दामोदर यांनी कारवाई केली आहे.