आ. मंगेश चव्हाण यांचे बस चालवून उदघाटन
चाळीसगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील महत्वाचे आगार असलेल्या चाळीसगाव बस आगारात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी. महामंडळ) ५ नवीन बसेसचा लोकार्पण सोहळा आज रविवारी दि. ६ एप्रिल रोजी संपन्न झाला. यावेळी आ. मंगेश चव्हाण यांनी स्वतः बस चालवून या बसेसचे उदघाटन केले.
चाळीसगाव बस आगारासाठी एकूण १० नवीन बसेस शासनाने मंजूर केल्या आहेत. त्यापैकी ५ बसेसचे आज रविवारी लोकार्पण करण्यात आले आहे. उर्वरित बसेस लवकरच आगारात दाखल होणार आहेत. यासोबतच चाळीसगाव येथे नवीन एसटी आगार बांधकामासाठी निधी मंजूर झाला असून प्रत्येक चाळीसगाववासीयांना अभिमान वाटेल असे सुसज्ज बसस्थानक उभारण्याचे काम सुरू होईल असे आ. मंगेश चव्हाण यांनी जाहीर केले. या सोहळ्याला आगार प्रमुख मयूर पाटील यांच्यासह भारतीय जनता पक्ष, महायुती महायुतीचे पदाधिकारी, मान्यवर आणि एसटी चे अधिकारी, कर्मचारी बंधू – भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.