चाळीसगाव (प्रतिनिधी) – भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रतिभा मंगेश चव्हाण यांना नागरिकांचा ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आज प्रभाग क्रमांक 6 मधील सकाळचा प्रचार दौरा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरुवात करून जहागीरदारवाडी, काकडे गल्ली, गुणे गल्ली, पोलीस स्टेशन परिसर, स्टेट बँक ADB, गणेश रोड, स्टेशन रोड आणि खंडेलवाल सुटकेसपर्यंत नागरिकांशी चर्चा केली. त्यांचे आशिर्वाद घेतले.

या जनसंपर्कातप्रतिभा चव्हाण यांच्यासोबत प्रभाग क्रमांक 6 चे अधिकृत भाजपा उमेदवार योगेश श्रीनिवास खंडेलवाल व योजना धनंजय पाटील यांनीही जनतेचे आशिर्वाद घेतले.

प्रभाग 6 हा अनेक वर्षे समस्यांशी झुंज देत होता. मात्र आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील रस्ते सुधारलेत, सर्व परिसर सुटसुटीत दिसू लागला आहे. प्रभाग क्रमांक 6 मधील लोकांनी विकास प्रत्यक्ष अनुभवला आहे.हे बदल आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे घडल्याची भावना लोकांनी जागोजाग बोलून दाखवली. आज नागरिकांच्या चेहऱ्यांवर दिसलेली समाधानाची भावना,त्यांनी दिलेले आशीर्वाद आणि व्यक्त केलेला विश्वास हिच आमची ताकद आहे. प्रभाग 6 मधील प्रत्येक नागरिकाने प्रेमाने व्यक्त केलेला पाठिंबा ‘द बेस्ट चाळीसगाव’च्या वाटचालीला बळ देणारा आहे.

भारतीय जनता पक्षाच्या प्रभागातील दोघेही उमेदवारांना व मला नगराध्यक्षा म्हणून कमळ या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याची विनंती केली










