चाळीसगाव तालुक्यातील वाघडू येथील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) : येथील ४८ वर्षीय शेतकऱ्याचा शेतातील विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील वाघडू येथे घडली. या घटनेने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
वाघडू येथील शेतकरी साहेबराव भीमराव पाटील (वय ४८) हे सोमवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास शेतात फेरफटका मारण्यास गेले होते. त्यांचा शेतातील विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. वडील घरी आले नाहीत, म्हणून मुलगा त्यांना पाहण्यास गेला असता हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी शेताकडे धाव घेत साहेबराव पाटील यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात नेला.
याप्रकरणी बबनराव बाजीराव पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.