रोजगार हमी, मोदी आवास योजना आढावा बैठक
चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील कोरडवाहू शेतकर्यांना शेतीला पाण्याचा हक्काचा स्त्रोत मिळावा यासाठी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मागेल त्याला १०० टक्के अनुदानावर विहिर व शेततळे देण्याची घोषणा चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केली. ते पंचायत समिती चाळीसगावद्वारा छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदान येथे आयोजित रोजगार हमी व मोदी आवास योजना आढावा बैठक प्रसंगी बोलत होते.
अवर्षणप्रवण चाळीसगाव तालुक्याने मागील वर्षी मोठ्या दुष्काळाचा सामना केला. मात्र अश्या परिस्थितीत लोकप्रतिनिधी या नात्याने शासनाकडून ३०० कोटींहून जास्त अनुदान, पीक विमा व दुष्काळी उपाययोजना निधी मिळवून देत शेतकर्यांना आधार दिला. त्यामुळे आमदार चव्हाण यांनी ही घोषणा केली.
यावेळी पंचायत समिती गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, माजी सभापती संजय पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, माजी जि प सदस्य किशोर पाटील, माजी नगरसेवक, आनंद खरात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हेमंत बाविस्कर, शैलेंद्रसिंग पाटील, प्रदीप पाटील, काकासाहेब माळी, भाऊसाहेब पाटील, सुभाष पाटील, धनंजय मांडोळे, बबन पवार, अमोल चव्हाण, रोहन सूर्यवंशी, नितीन चौधरी, अतुल पाटील, यांच्यासह चाळीसगाव तालुक्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, विकासो संचालक, शेतकरी, पंचायत समिती व रोजगार हमी योजना विभागाचे कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.