चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटातील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) : मालमत्तेच्या वादावरून शेख नफिस शेख मोहम्मद याला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या गळ्यावर चाकूने वार करून दोघेजण फरार झाले. ही घटना दिनांक १२ रोजी पहाटे तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान कन्नड घाटात घडली. यात तो गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी त्या दोघा हल्लेखोरांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.
जखमी शेख नफिस शेख मोहम्मद (सलाटर हाउस, पवार वाडी, मालेगाव) यास त्याचा भाऊ शेख रईस शेख मोहम्मद व त्याचा मित्र सोमीन मोहम्मद उमर फजल मोहम्मद (दोन्ही मालेगाव) यांनी फिरण्याच्या उद्देशाने कन्नड घाटात दुचाकीने आणले. घाटातच मालमत्तेमधील हिश्श्याच्या कारणावरून त्यास जाब विचारत त्याचा भाऊ शेख नफिस शेख मोहम्मद याने त्याच्या गळ्यावर चाकूने वार केले. आणि तेथून पसार झाले. जखमी शेख नफिस शेख मोहम्मद याला उपचारासाठी लोकांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
उपचारादरम्यान त्याने ग्रामीण पोलिसांना या घटनेचा जबाब दिला. पोनि राहुल पवार यांनी मालेगाव येथे पथक रवाना केले. सोमवारी दुपारी दोघी आरोपींना अटक केली आहे.