चाळीसगाव शहरात लांबवला दीड लाखाचा ऐवज
चाळीसगाव (प्रतिनिधी) : शहरातील धुळे रोडवरील तेजस कोणार्क पार्कमधील बंद घर फोडून चांदीच्या मूर्ती व रोख रक्कम असा सुमारे १ लाख ६६ हजाराचा ऐवज लांबविला. कुटुंब पंढरपूरला गेल्याने चोरट्यांनी संधी साधली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तेजस कोणार्क पार्कमधील बांधकाम व्यावसायिक प्रवीण पाटील १३ रोजी कुटुंबासह आषाढी एकादशीनिमित पंढरपूर येथे गेले होते. त्यामुळे त्यांच्या घराला कुलूप होते. ही संधी साधत देव्हाऱ्यातील तीस हजार रुपये किमतीच्या अर्धा किलो वजनाच्या चांदीच्या मूर्ती व कपाटातील लॉकरमधील १ लाख ६६ हजार रुपये असा ऐवज चोरून नेला. घरात चोरी झाली हे कळताच कुटुंबियांनी जळगावात आल्यावर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.