पाच जणांविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा
चाळीसगाव (प्रतिनिधी ) ;- चाळीसगाव तालुक्यातील सांगवी येथील व्यवसायाने ऊसतोड मुकादम असलेल्या 38 वर्षीय व्यक्तीकडे संत मुक्ताई शुगर फॅक्टरी घोडसगाव ता. मुक्ताईनगर यांच्याकडील उचलचे पैसे देणे घेणे असल्याच्या कारणावरून पाच जणांनी त्यांना मारझोड करून संत मुक्ताई शुगर फॅक्टरी येथे एका खोलीत डांबून मारहाण केल्याचा ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत पाच जणांविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की महादू बाळू राठोड वय 38 हे ऊसतोड मुकादम असून चाळीसगाव तालुक्यातील सांगवी येथे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. महादू राठोड हे २१ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी साडेतीन ते साडेचार वाजेच्या सुमारास आपल्या मोटारसायकलीने बेलगंगा साखर कारखाना मालेगाव रोडवरून जात अस्तनांना त्यांची मोटरसायकल अडवून त्यांना मारठोक करून पांढर्या रंगाच्या बोलेरो वाहनात बसवून मुक्ताई शुगर फॅक्टरी घोसडसगाव ता. मुक्ताईनगर येथे नेऊन १२ क्रमांकाच्या रूममध्ये २१ फेब्रुवारीच्या रात्री साडेदहा ते दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडे पाच वाजेच्या दरम्यान बळजबरीने डांबून ठेवले. तसेच तसेच त्यांना चापटा बुक्क्यांनी मारहाण करून धमकी दिल्याचा प्रकार घडला. तसेच याप्रकरणी महादू राठोड यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून संशयित शेतकी अधिकारी मुकेश भामरे, कृषी सहाय्यक विठ्ठल तिवटे, ऊस पुरवठा अधिकारी संदीप कोळी, गेट सुपरवायझर नरेंद्र पाटील आणि ड्रायव्हर प्रमोद पंडित सर्व रा. संत मुक्ताई शुगर फॅक्टरी घोडसगाव ता. मुक्ताईनगर या पाच जणांविरुद्ध 16 जुलै रोजी सायंकाळी साडेचार वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण सपकाळे करीत आहे.