जळगाव ( प्रतिनिधी ) – दुचाकी घेण्यासाठी माहेरहून १ लाख रूपये आणावे, यासाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या मंडळींविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला
अंजली आकाश पवार ( वय-२४ ) .सुप्रीम कॉलनी , जळगावच्या माहेरवाशीण आहेत. त्यांचा विवाह २४ एप्रील २०१९ रोजी आकाश पवार (रा.सिल्वासा, दादरा नगर हवेली गुजरात) यांच्याशी झाला लग्नानंतर दोन महिने सासरच्या मंडळींनी चांगली वागवणूक दिली. नंतर, मात्र वेगवेगळ्या कारणांनी छळ करण्यास सुरूवात केली सासरे दिलीप पवार यांनी दुचाकी घेण्यासाठी माहेरहून १ लाख रूपये आणावे असा तगादा लावला.
माहेरच्यांची परिस्थिती बिकट असल्याने पैसे दिले नाही. याचा राग आल्याने मारहाण केल्याचे तक्रारीत नमुद आहे. त्यामुळे विवाहिता माहेरी निघून आल्या. विवाहितेच्या फिर्यादीवरून पती आकाश पवार, सासरे दिलीप पवार, सासू जुगरीबाई पवार ( सर्व रा. सिव्हासा, दादर नगर हवेली गुजरात ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो ना संजय धनगर करीत आहेत.