भुसावळ तालुक्यातील खडका गावातील घटना
भुसावळ (प्रतिनिधी ) ;- जुन्या भांडणाच्या कारणावरून तरूणाला शिवीगाळ करत चाकूने वार करून जखमी करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना रविवारी ११ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजता तालुक्यातील खडका गावात घडली. याप्रकरणी मंगळवारी १३ ऑगस्ट रोजी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खडका येथे तेजबहाद्दुरसिंह सुरेंद्रसिंग पाटील हा तरूण आपल्या परिवारासह राहायला असून रविवारी ११ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास ते त्यांच्या घराच्या समोर बसलेले असतांना जुन्या भांडणाच्या कारणावरून तुषार वासुदेव भोळे, दर्शन दत्तात्रय भोळे, भुषण बेंडाळे, अनुराग नांदेळकर सर्व रा. खडका ता.भुसावळ यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. यातील एकाने चाकूने त्यांच्यावर वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी तेजबहाद्दुरसिंह याचे वडील सुरेंद्रसिंग पाटील यांनी भुसावळ तालुका पोलीसात धाव घेवून तक्रारदिल्यावरून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक फौजदार श्याम कुमार मोरे करीत आहे.