महाविकास आघाडीचे प्रभाकर सोनवणे यांचा ३२ हजार ३१३ मतांनी केला पराभव
चोपडा (विशेष प्रतिनिधी) :- येथील चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत दोन्ही सोनवणेंच्या लढतीत महायुतीचे उमेदवार प्रा. चंद्रकांत सोनवणे सरांनी विजय मिळवला. महाविकास आघाडीचे प्रभाकर सोनवणे यांचा ३२ हजार ३१३ मतांनी पराभव केला आहे.
आता सर्व २५ फेऱ्या संपलेल्या आहे. किशोर पाटील यांना २५ व्या फेरीअखेर १ लाख २२ हजार ८२६ तर प्रभाकर सोनवणे यांना ९० हजार ५१३ मते मिळाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार हिरालाल कोळी यांनी २११८ मते मिळवून लक्ष वेधून घेतले आहे. चोपडा तालुक्यातील विविध गावागावांत महायुतीकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे.