चाळीसगाव लोहमार्ग येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : रेल्वेमध्ये मोबाईल व रोकड चोरी केल्याप्रकरणी जळगाव शहरातील मेहरूण भागातील चार चोरट्यांना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे रेल्वे पोलीस आणि एमआयडीसी पोलिसांनी शिताफिने अटक केली आहे. याबाबत चाळीसगाव लोहमार्ग पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीतांकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लोहमार्ग चाळीगाव पोलीस स्टेशनला दि. १ जून रोजी १२ वाजेच्या सुमारास फिर्यादी रोहीत विमल यादव (वय-२३ रा. भवानीपुरा,राजधाम, जिल्हा पुर्णिया राज्य बिहार) सोबत दोन मित्र असे पटना-ते-मुंबई जात असतांना यातील ३ ते ४ अनोळखी चोरट्यांनी फिर्यादी व त्यांचे मित्र झोपलेले असतांना त्यांच्याकडील ६० हजार रुपये किंमतीचे ३ मोबाईल व रोख रुपये असे चोरुन नेल्याबाबत गुन्हा दाखल होता.
सदर गुन्हांत आरपीएफ जळगाव यांचे कडून मिळालेल्या सिसिटीव्ही फुटेज वरुन संशयित आरोपी नामे गुरुजितसिंग सुजानसिंग बावरी (वय २५, रा. शिरसोली नाका, तांबापुरा, जळगाव), शेख अजर शेख मजर (वय २८, रा. पाण्याच्या टाकीच्या समोर, सुप्रिम कॉलनी, जळगाव), सुधिर सुभाष भोई (वय १९, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव), अल्ताफ फिरोज खान (वय- २० रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांना एमआयडीसी पोलिसांनी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २ जून रोजी दुपारी ३ वाजता जळगाव शहरातील मेहरुण परीसरातुन ताब्यात घेण्यात आले आहे.
संशयितांकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेले मोबाईल हस्तगत करण्यात आलेले आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक डॉ महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागिय पोलीस अधिकारी संदीप गावित, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पो उप निरी दिपक जगदाडे, पोहेकों समाधान टहाकळे, पोना विकास सातदिवे, पोना किशोर पाटील, पोना सचिन पाटील, पोकों चंद्रकांत पाटील, पोकों इनाण बेग, पोकों चद्रकांत पाटील अशांनी केली.
सदर संशयित आरोपी यांना चाळीसगांव लोहमार्ग पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तसेच कारवाईत जळगाव येथिल रेल्वे सुरक्षा बल अधिकारी पो नि देविप्रसाद मिना, उप.निरी. के. आर.तड, पि.डी. पाटील, महेंन्द्र कुसावा, विनोद जेटवे, विनोदकुमार अशांचा सहभाग होता.