पाचोरा तालुक्यातील होळ येथील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील होळ येथून शेतातून चोरून नेलेल्या बैलांचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केल्यानंतर त्याचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केले आहे.
तालुक्यातील नगरदेवळा पोलीस स्टेशन हद्दीत फिर्यादी अनिल गोविंदा चौधरी (वय ५२,रा. होळ, ता. पाचोरा) यांनी फिर्याद दिली. दि. ५ जून रोनी रोजी रात्री ते दि. ६ जून रोजी सकाळी ०६ वाजेच्या दरम्यान कुणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे होळ शिवारातील त्यांच्या शेतातून त्यांचा ३० हजार रुपये किंमतीचा लाल भु-या रंगाचा बैल हा चोरी करून चोरून नेला. पाचोरा पोलीस स्टेशनला ६ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पाचोरा पोलीस स्टेशनचे कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज व माहिती काढली.
संशयीत आरोपी हा जामनेर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात आहे. ही माहिती पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना कळवून त्यांच्या परवानगीने जामनेर जाउन संशयित आरोपी राजमल अर्जुन बोरसे (वय ३४, रा. लोहरी बु. ता. जामनेर) यांस विचारपूस करून ताब्यात घेतले. त्यानी हा गुन्हा केल्याची कबूली दिली.
त्याचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यास अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात आरोपीने चोरी केलेला बैल हा पाचोरा पोलीस स्टेशन येथे आणून त्यास श्रीराम गोशाळा, पाचोरा येथे पाठविण्यात आले.
कामगिरी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अशोक पवार, पोउपनिरी प्रकाश चव्हाणके, पोउपनिरी कैलास पाटील, सफौ निवृत्ती मोरे, पोहेकों विनोद पाटील, पोहेकों राहुल शिंपी, पोना अमोल पाटील, पो.ना. मनोहर पाटील, पोकों दिनेश पाटील, चालक मजिद पठाण, पो, कॉ. योगेश पाटील, कमलेश राजपूत यांनी पार पाडली आहे.