जळगाव;- एका सॉमिलमध्ये अज्ञात चोरट्यांनी ३० हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेणाऱ्या दोन संशयित आरोपींना शहर पोलीसांनी गेंदालाल मिल परिसरातून अटक केली आहे. दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. संशयित आरोपी किरण अनिल बाविस्कर (वय-३०) आणि शंकर विश्वनाथ सांबळे (वय-२१) दोन्ही रा. गेंदालाल मिल असे आरोपींचे नाव आहे .

सुधीर नटरवरलाल शहा (वय-५६) रा. नागेश्वर कॉलनी, महाबळ यांचे शिवाजी नगर आणि कनळदार रोडवर श्रीनाथ नावाचे सॉमिल आहे. त्याच ठिकाणी त्याचे ऑफिस व इलेक्ट्रिकसाठी लागणारे साहित्य ठेवण्यात आले आहे. शनिवारी मध्यरात्री १.३० ते २.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सॉमिलमधील तीन खोल्यांचे कुलूप तोडून इलेक्ट्रीक ॲम्पिअर, ईलेक्ट्रिक लहान मिक्सर, वायरचे बंडल, स्पिकर आणि क्लिपचा बाँक्स असा एकुण अंदाजे ३० हजार रूपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला होता. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरिक्षक धनंजय येरूळे यांच्या मार्गदर्शनाखाली. सहाय्यक फौजदार वासूदेव सोनवणे, पोहकॉ रतन गिते, विजय निकुंभ, योगेश इंधाटे, तेजस मराठे यांनी कारवाई करत संशयित आरोपी किरण अनिल बाविस्कर (वय-३०) आणि शंकर विश्वनाथ सांबळे (वय-२१) दोन्ही रा. गेंदालाल मिल यांना रविवारी रात्री राहत्या घरातून अटक केली आहे. आज न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ उमेश भांडारकर करीत आहे.







