अनेक जणांची होणार चौकशी
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील जळगाव शहर पोलीस स्टेशन व चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला दाखल माजी विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांच्याशी संबंधित गून्ह्यांशी चौकशीसाठी सीबीआयचे दोन अधिकाऱ्यांचे पथक सोमवारी दि. १६ रोजी जळगावात धडकले. या पथकाकडून चौकशी करून त्याचा अहवाल वरिष्ठांना दिला जाणार आहे.
ॲड. प्रवीण चव्हाण यांच्याविरुद्ध जळगाव शहर पोलीस ठाण्यात कट रचून खोट्या गुन्ह्यात निलेश भोईटेसह इतरांना अटकवण्याचे षडयंत्र रचल्याचाही गुन्हा दाखल आहे. सीबीआयच्या पथकामध्ये पथकामध्ये अपर पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यासह अन्य एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. तसेच या पथकाने दोघं गुन्ह्यांशी संबंधित व्यक्तींना चौकशीसह जाब-जबाबसाठी बोलविले आहे. आज काही जणांची चौकशी केल्याची माहिती मिळाली आहे.
हे पथक आठवडाभर थांबणार आहे. खंडणी प्रकरणी सूरज झंवर यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. उदय पवार यांच्या माध्यमातून तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी झँवर यांचेकडून १ कोटी २२ लाखांची खंडणी स्वीकारली होती. बीएचआर प्रकरणात तुझ्या वडिलांना बाहेर येऊ देणार नाही. सुरेशदादांना ज्याप्रकारे पाच वर्षे मध्ये ठेवलं तसं तुझ्या वडिलांना देखील आत ठेवेल, अशी धमकी देत सूरज झंवर यांचेकडून खंडणी उकळली होती. सदर गुन्हा सीबीआयकडे वर्ग झालेला आहे. त्याचा तपास सुरू आहे.