जळगाव ( प्रतिनिधी )– शहरातील हरीविठ्ठल नगर परिसरात हातात तलवार घेवून दहशत माजविणाऱ्या तरूणाला रामानंदनगर पोलीसानी ताब्यात घेतले व तलवार हस्तगत केली रामानंदनगर पोलीस ठाण्यात या तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला
हरीविठ्ठल नगरातील आत्महत्या कॉलनी परीसरात संशयित आरोपी अक्षय प्रकाश गवई (वय-२१ , रा. कुसुंबा, ता.जळगाव , ह.मु. हरीविठ्ठल नगर ) २४ ऑक्टोबररोजी दुपारी हातात तलवार घेवून दहशत माजवित असल्याची माहीती रामानंदनगरचे पो नि विजय शिंदे यांना मिळाली. त्यानुसार पोलीसांचे पथक रवाना झाले. पोलीसांनी संशयित आरोपी अक्षय गवई याला तलवारीसह ताब्यात घेतले. पो कॉ रविंद्र चौधरी यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला . पुढील तपास पोहेकॉ दिपक शिरसाठ करीत आहेत