चाळीसगाव तालुक्यातील घटना ; २ वर्षीय बालक गंभीर
जळगाव (प्रतिनिधी );- स्विफ्ट डिझायरने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत सालदारासह त्याची पत्नी,मुलगी आणि मालक जागीच ठार झाले असून २ वर्षीय बालक गंभीर जखमी झाल्याची घटना आज चाळीसगाव -नांदगाव रस्त्यावरील हॉटेल नक्षत्र जवळ दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली .
जखमींमध्ये २ वर्षाचा बालक असून या बालकाला पुढील उपचारासाठी धुळे येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती देखील चिंताजनक असल्याची माहिती मिळतेय.
नांदगावकडून चाळीसगावकडे भरधाव वेगात येत असलेले मारुती कंपनीची स्विफ्ट डिझायर क्रमांक एम.एच.०२ डी.जे.ने समोरून येणाऱ्या मोटर सायकल क्रमांक एम.एच.०२ ई.डी. ६४७६ ला समोरून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघातात मोटरसायकलचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला, तर स्विफ्ट कारचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
अपघातात मोटारसायकलवरून सालदार विलास मोरे व त्याच्या परिवाराला त्याच्या मूळ गावी तांदुळवाडी येथे सोडवण्यासाठी गाडी जात होती. त्यांच्यासोबत भगवान नागराज पाटील (३६) वाघडू, सालदार विलास वसंत मोरे (४०) त्याची पत्नी कल्पना मोरे (३६) मुलगी रेणुका (३) हेही होते. या सर्वांचा जागीच मृत्यू झाला. तर २ वर्षांचा चिमूरडा अमोल मोरे या अपघातात जखमी झाला. त्याला अधिक उपचारासाठी धुळे येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आलं आहे.