शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील उपहारगृह सुविधांमध्ये पडते अपुरे
जळगाव (प्रतिनिधी) : शासकीय वैद्यकीय महाविदयालयाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रवेशित असलेले तसेच आस्थापनेवर कार्यरत वरिष्ठ व कनिष्ठ निवासी अधिकारी यांनी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांना नुकतेच निवेदन दिले आहे. रुग्णसेवेसाठी आम्हाला २४ तास उपस्थित रहावे लागत असते, याठिकाणी परिसरात कॅण्टीन उपलब्ध नसल्यामुळे आम्हाला वारवार बाहेर जावे लागत असते. याकरिता कॅन्टीनची सोय उपलब्ध करून द्यावी अशी मागणी डॉक्टरांनी केली आहे. आताचे डोळ्यांच्या कक्षाजवळ असलेले उपहारगृह हे सुविधांमध्ये पुरेसे होत नाही. यामुळे नवीन कॅन्टीनची मागणी होत आहे.
रुग्णालयात आता आंतरवासीता विद्यार्थ्यांचीदेखील वैद्यकीय सेवा सुरु झालेली आहे. यामुळे एमबीबीएस, वरिष्ठ व कनिष्ठ विद्यार्थी, आंतरवासीता विद्यारथी एवढ्या विदयार्थ्यांना या परिसरातच कॅण्टीनची नितांत आवश्यकता आहे. ब-याचवेळा डॉक्टर नाश्ता/चहा घेण्यासाठी गेल्यावर त्याठिकाणी अनुपस्थित राहिल्यास नातेवाईक व लोकप्रतिनिधी है डॉक्टर उपलब्ध नसल्याचाबतची तक्रार अधिष्ठातांकडे करीत असतात त्यामुळे रुग्णालयाच्या परिसरातच कॅण्टीन उपलब्ध झाल्यास या समस्येचे निराकरण होणार आहे.
तसे पाहिले तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध उपहारगृह हे फक्त रुग्णांसाठीच असल्याचे दिसून येत आहे. त्याच्यातही महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना व डॉक्टरांना पुरेशा सुविधा मिळत नाही. त्यामुळे त्यांचे हाल होत आहे. आधीचे कॅन्टीन हे एका ठेकेदाराला चालवायला दिलेले आहेत. मात्र त्याबाबत अधिष्ठातांकडे तक्रारी सुरु झाल्या आहेत. आता तर डॉक्टरांनी नवीन कॅन्टीनची मागणी केल्यामुळे आधीच्या उपहारगृहावर प्रश्न उपस्थित झाले आहे.