जळगाव (प्रतिनिधी ) ;- .हिराबाई जगतराव पाटील माध्यमिक विद्यालय शिरसोली प्रबो येथे लायन्स क्लब जळगाव व कॅन्सर पेशंट एड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने (वय वर्ष 9 ते 18 वर्ष मुलींसाठी )गर्भमुख कॅन्सर विषयी प्रतिबंधात्मक मोफत लसीकरण विषयी मार्गदर्शन आज 12शुक्रवार रोजी वय वर्ष 9 ते 18 वर्षे वयातील मुलींना गर्भमुख कॅन्सर मोफत लसीकरण या विषयी पाचवी ते बारावीपर्यंत मुलींना डॉ.सौ.श्रद्धा चांडक यांनी मार्गदर्शन केले. डॉ.श्रद्धा चांडक म्हणाल्या की, दरवर्षी भारतात 80 हजार महिलांना गर्भमुखाच्या कॅन्सर होतो. म्हणजे दर दिवसाला 200 महिलांमध्ये कॅन्सरचे निदान होत आहे वर्षाकाठी 40 हजार त्याचे मुख्य कारण हा HVP ही नामक विषाणूआहे. या विषाणूंचा गर्भमुखात संसर्ग होण्यापूर्वीच HVP लशीचा केवळ एका डोसा मध्ये शरीरात तयार होणारी प्रतिकारशक्ती या विषयांना मारक ठरेल. त्यामुळे उद्भवणाऱ्या कॅन्सरला प्रतिबंध मिळेल असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले .
कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.कल्पना प्रमोद पाटील व महिला शिक्षिका सौ.कामिनी पाटील सौ.योगिता बडगुजर सौ. ज्योती धनगर सौ मनीषा पाटील या महिला शिक्षिका व इयत्ता पाचवी ते बारावीच्या बहुसंख्य विद्यार्थिनी उपस्थित होत्या.