महादेव हॉस्पीटल व जैन महिला मंडळाचा उपक्रम
जळगाव ( प्रतिनिधी ) – आकाशवाणी चौकातील महादेव हॉस्पीटल व जैन महिला मंडळाच्या सयुक्त विद्यमाने कॅन्सर व हदयरोग शिबिरात ७४ महिलांची तपासणी करण्यात आली.

यावेळी अध्यक्ष दिप्ती अग्रवाल, सचिव गुंजन कांकरीया, सल्लागार रत्नाभाभी जैन, कमलाबाई अग्रवाल,शैलाभाभी मयुर गोदावरी फॉउंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील, स्त्रीरोग तज्ञ डॉ.माया आर्विकर, डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाचे संचालक नेत्ररोग तज्ञ डॉ. एन एस आर्विकर इ मान्यवर उपस्थीत होते. यावेळी सुधा सांखला आणि नीता छोरीया यांचे सह स्त्रीरोग तज्ञ डॉ. माया आर्विकर यांनी आरोग्याची माहिती दिली. डॉ. वर्षा पाटील स्त्रीयांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त करीत शिबिराच्या माध्यमातून जनजागृती व आरोग्य राखण्यात मदत होत असल्याचे सांगितले तर रत्नाभाभी जैन यांनी मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक करत आरोग्य शिबिरे ही काळाची गरज असल्याचे सांगितले.स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. माया आर्विकर यांच्या मार्गदर्शनानुसार डॉ. प्राजक्ता पाटील, डॉ. रश्मी संघवी, फिजिशियन डॉ जयेश पाटील, हदयरोग तज्ञ डॉ मनुमिता रेडडी यांनी महिलांची रक्तदाब,पॅपस्मिअर, ब्रेस्ट, इसीजी आणि टुडीइको तपासणी केली.यावेळी स्त्रीरोग व फिजिशियन सल्ला देखिल देण्यात आला. शिबिराच्या यशस्वीतेसाठी महादेव हॉस्पीटलचे डॉ. संस्कृती भिरूड, मार्केटींग ऑफीसर रत्नेशकुमार जैन यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.









