रोटरी क्लब ऑफ भुसावळचा उपक्रम
जळगाव ( प्रतिनिधी ) – रोटरी क्लब ऑफ भुसावळ तर्फे समाजातील सर्व स्तरातील महिलांसाठी दिनांक ५ जाने ते १० जाने २६ दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत एकूण सहा दिवसांचे चे ब्युटी पार्लरच्या कोर्सचे आयोजन करण्यात आले होते. याचा उद्देश समाजातील सर्व महिला आर्थिक सक्षम झाल्या पाहिजे व आपल्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे.
या कोर्स मध्ये क्लिनजिंग,टोनिंग, फेशियल, वॅक्सिंग, मैनिक्युर, पैडीक्युर, डे मेकअप, नाईट मेकअप इत्यादी अनेक विषय शिकवण्यात आले. प्रकल्प प्रमूख म्हणून रो. चारुशीला महाजन मॅडम, (इव्हास ब्युटी पार्लरच्या संचालिका) यांनी काम पाहिले व संपूर्ण आठवडाभर महिला व मुलींना मार्गदर्शन केले. प्रकल्प को-ऑर्डिनेटर म्हणून रो. डॉ माया अर्विकर मॅडम, रो.मंगला पाटील मॅडम व सेक्रेटरी रो. रत्नाकर क्षीरसागर यांनी सहकार्य केले. या कोर्स ला भरपूर प्रतिसाद मिळाला एकूण ७५ महिलांनी सहभाग नोंदवला. शेवटच्या दिवशी म्हणजेच १०/०१/२६ रोजी. दुपारी ४.०० वाजता भुसावळ नगरीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा माननीय सौ गायत्री भंगाळे यांच्या हस्ते सर्व महिलांना प्रमाणपत्र व गिफ्ट हॅपर देण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ भुसावळ चे अध्यक्ष रो. संजय चापोरकर यांनी रोटरी क्लब द्वारा करण्यात येत असलेल्या प्रकल्पांची माहिती दिली. रोटेरियन चारुशीला महाजन व माननीय सौ गायत्री भंगाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. रोटेरियन रत्नाकर क्षीरसागर यांनी सूत्र संचालन केले, रोटेरियन मंगला पाटील यांनी आभार मानले. याप्रसंगी सर्व रोटेरियन उपस्थित होते.









