जळगाव ( प्रतिनिधी ) – चुकीच्या बाजूने येणाऱ्या बसने धडक दिल्याने उभ्या असलेल्या ट्रकमधील हमालाला जखमी केल्याची घटना काल सायंकाळी उमाळ्याजवळ घडली.
जखमी झालेले पांडुरंग बुचाले ( रा – हरिविठ्ठलनगर ) यांनी एम आय डी सी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , ते काळ सायंकाळी संजय हटकर , संदीप कोळी व अन्य जोडीदारासोबत ट्रकमधील माल खाली करण्यासाठी उमाळा येथे गेले होते जाताना रस्त्यात एका ट्रकमधील डिझेल संपल्याने ती उभी असल्याचे पाहून थांबले होते . त्याचवेळी चुकीच्या बाजूने येणाऱ्या बस ( क्र – एम एच १९ वाय १११२ ) ने त्यांना धडक दिली या धडकेत पायांना मार लागून ते जखमी झाले त्यांच्या साथीदारांनी त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले आणि धडक देणाऱ्या बसची माहिती पोलिसांना दिली होती पोलसांनी बस एम आय डी सी पोलीस ठाण्यात नेऊन उभी केली होती बसच्या चालकाविरोधात या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे .