जळगाव (प्रतिनिधी) – रेल्वेच्या प्रदीर्घ सेवेनंतर भुसावळ रेल्वे विभागतुन दि. 30 सप्टेंबरला 38 कर्मचारी सेवानिवृत झालेत रेल्वेतर्फे तत्काळ 12 कोटी 13 लाख 88 हजार रुपये ऑनलाइन त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले. या सेवानिवृत्ति संदर्भात रेल्वेद्वारा वर्चुअल ऑनलाइन सेवानिवृत्ति कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे समारंभाचे आयोजन न करता सेवानिवृत कर्मचारी यांचा यथोचित सन्मान वर्चुअल ऑनलाइन सेवानिवृत्ति कार्यक्रमाद्वारे तसेच त्यांच्या सेवेच्या कार्यालयात रेल्वे प्रतिनिधि म्हणून भुसावळ, बुरहानपुर, खंडवा, अकोला, मूर्तिजापुर ,बड्नेरा, अमरावती, जलगांव, चालीसगाँव, मनमाड, नासिक, इ. ठिकाणी कल्याण निरीक्षकानी जाऊन पी.पी.ओ फोंल्डर दिलेत.
सेवानिवृति बद्दल कर्मचारी यांना मंडल रेल प्रबंधक विवेक कुमार गुप्ता, अपर मंडल रेल प्रबंधक मनोज सिन्हा, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन.डी. गांगुर्डे यांनी सेवानिवृत्तिबद्दल संबोधित करून पुढील भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच हिंदी राजभाषा अधिकारी एस. पी. वाढवे यांना भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.