चाळीसगाव तालुक्यातील मालेगाव रस्त्यावरील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) : – चाळीसगाव ते मालेगाव रस्त्यावर तालुक्यातील बिलाखेड येथील मेंढीफार्मजवळ बस व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना १४ रोजी सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास घडली. गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीस धुळे येथे उपचारार्थ हलवण्यात आले आहे. संबंधित पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.
चाळीसगावकडून मालेगावच्या दिशेने एसटी बस (एमएच-१४, बीटी- २३३८) ही जात होती, तर मालेगावकडून चाळीसगावच्या दिशेने दुचाकी (एमएच- १५, बीएम ६५७०) ही येत होती. याच बस व दुचाकीची जबर धडक झाली. या दुर्दैवी अपघातात दुचाकीवरील मामा सलीम शरीफ शेख (वय ३५, रा. पिंपरखेड, ता. चाळीसगाव) हे जागीच ठार झाले. तर त्यांचा भाचा अरबाज रफिक शेख (वय २५, रा. मालेगाव) हा गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्दैवी घटना १४ रोजी दुपारी सव्वापाच वाजेच्या सुमारास चाळीसगाव ते मालेगाव रस्त्यावरील तालुक्यातील बिलाखेड शिवारातील मेंढीफार्मजवळ घडली. संबंधित पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.