जळगाव (प्रतिनिधी) : येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर आनंदा पाटील उर्फ नंदू आप्पा यांची बुलंद छावा मराठा युवा परिषदेच्या संभाजीनगर येथील विभागीय कार्यालयात प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
संघटनेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष नानासाहेब कुटे पाटील व प्रदेश सचिव सुरेश वाकडे पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष सतिष वेताळ पाटिल व प्रदेश संघटक मनोज गायके पाटिल यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. नियुक्ती पत्र घेतानां त्यांच्या सोबत जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटिल, मनोज मोहिते, उमेश पाटिल, भुषण भदाणे, महेश बोरसे, प्रमोद आमोदकर, विशाल कपले शंभु पाटील, कुणाल पाटील, लकी पाटील, भुषन पाटील, मयुर नाथ, किशोर भदाणे, सागर चव्हाण, बापु कासार, संजय काकडे, गोरख तरटे, किशोर पाटील, प्रकाश झुरके आदीं होते. त्यांचे सर्व समाजातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.