चाळीसगाव तालुक्यातील घटना
चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – पाटणा येथील २२ वर्षीय विवाहित तरुणीचा विहिरीत बुडून मृत्यू झाला . चाळीसगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पाटणा येथील सणुजा निरज फराटे (वय-२२ , ह.मु. पाटणा ) या विवाहित तरूणीचा शिवारातील एका विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी उघडकीला आली या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सणुजा फराटेचे सासर हे पुणे जिल्ह्यातील मांडवगण आहे. ती आईवडिलांकडे आलेली असताना हि घटना घडली. वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पो नि संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास ठाकूर हे करीत आहेत.