चाळीसगाव;- तालुक्यातील पातोंडा येथे घरातून शौचासाठी बाहेर गेलेल्या एका २५ वर्षीय विवाहितेचा विहीरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना येथे घडली असून याबाबत परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सोनम पांचाळ असे मयत महिलेचे नाव आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, श्रावण फकीरा पांचाळ (सोनवणे) यांचा मोठा मुलगा सुरेश याची पत्नी सोनम पांचाळ ही ३ मे रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास शौचासाठी घराबाहेर गेली होती. बराच वेळ झाली तरी ती घरी परतली नाही तेव्हा घरच्यांनी परिसरात शोधाशोध केली. अखेर दुपारी तीनच्या सुमारास गावालगत असलेल्या पंडीत नरहर वाणी यांच्या विहीरीत सोनमचा मृतदेह आढळून आला.
फिर्यादीत नमूद प्रमाणे सोनम ही नेहमी ताण-तणावात असायची. गेल्या वर्षी तिने अतिप्रमाणात गोळ्या सेवन करून आत्महत्या करण्याचे प्रयत्न केले होते. सुदैवाने चाळीसगाव येथील खासगी हॉस्पिटलमध्ये वेळीच औषधोपचार झाल्याने सुदैवाने ती वाचली होती. यानंतर तिचा मृतदेह विहरीत आढळून आल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.
या घटने प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसांत रात्री उशिरानोंद करण्यात आली असून पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार धर्मराज पाटील हे तपास करीत आहेत.
—————-







