कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर
वाचा नेमकी कुठे घडली ही घटना…
जळगाव (प्रतिनिधी) : इगतपुरीच्या भावली धरणात ५ तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भावली धरणावर फिरण्यासाठी गेलेले असताना ही दुर्घटना घडली आहे. नाशिकरोड येथून रिक्षा घेऊन सर्वजण धरणावर फिरण्यासाठी आले होते. आज सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांमध्ये तीन मुली व दोन मुलांचा समावेश आहे. स्थानिक आदिवासी नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले.
मृत सर्वजण नाशिकचे आहे. हे सर्वजण फिरण्यासाठी आले होते. आज दुपारी रिक्षा घेऊन धरणावर फिरण्यासाठी आले होते. हे सर्वजण गोसावी वाडी,जेल रोड नाशिक येथील राहणारे आहेत. इगतपुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन कार्यवाही सुरु केली आहे. स्थानिक आदिवासी नागरिकांच्या मदतीने ५ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
मृतांची नावे
1) अनस खान दिलदार खान (वय १५)
2) नाझिया इमरान खान (वय – १५)
3) मिसबाह दिलदार खान- (वय १६)
4) हनीफ अहमद शेख (वय २४)
5) ईकरा दिलदार खान (वय १४)