आगामी निवडणुकीत बीआरएसचा झेंडा : जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील शिरसोली येथे जळगाव ग्रामीण मतदारसंघात मोठ्या संख्येने जेष्ठ आणि युवकांनी बीआरएस म्हणजेच भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ लकी अण्णा टेलर यांनी गुलाबी रुमाल आणि पक्षाची माहिती पुस्तिका देऊन सर्वांचे यावेळी स्वागत केले. १०० पेक्षा अधिक युवकांनी स्वयंस्फूर्तीने पक्षात प्रवेश केला. शिरसोली येथील श्रीकृष्ण मंदिरात २९ ऑक्टोबर रविवारी सायंकाळी प्रवेश सोहळा झाला. बीआरएस पक्षाचे गुलाबी वादळमुळे आजी माजी मंत्र्याची देखील आता कसोटी लागणार असल्याची जोरदार चर्चा जळगाव ग्रामीण मतदार संघासह जळगाव जिल्ह्यात सुरू झाली. आगामी काळात देखील अनेक दिग्गज प्रवेश करणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
बीआरएस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव म्हणजेच केसीआर यांचे शेतकरी आणि गोरगरीब जनतेच्या हितासाठी असणारी दूरदृष्टी असे नेतृत्व यावर विश्वास ठेवत तसेच प्रभारी वामशीधरराव , प्रदेश प्रमुख माणिकराव कदम, उत्तर महाराष्ट्र समन्वयक नानासाहेब बच्छाव यांचे मार्गदर्शनात आता लोकांना परिवर्तन हवे आहे. शेतकरी आणि गोर गरीब जनतेच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी सरकारची असणारी उदासीनता याला पर्याय म्हणून आता बीआरएस पक्षात प्रवेश होत आहेत. आगामी निवडणुकीत आता बीआरएस पक्षाचा गुलाबी झेंडा नक्कीच फडकेल असा ठाम विश्वास यावेळी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गंगाराम पाटील लकी अण्णा टेलर यांनी व्यक्त केला. भगवान धनगर यानी देखील यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचलन भगवान सोनार यांनी केले तर आभार रामकृष्ण ताडे यानी मानले.अशोक नागो ताडे, रामकृष्ण ताडे, इच्छाराम ताडे, संतोष ताडे, भागवत ताडे, नाना पाटील, सुरेश खलसे, भिला ताडे, विजय ताडे, नारायण ताडे, भैय्या बारी, किरण ताडे, रविंद्र आडबाल यांचे सह १०० युवकांनी बीआरएस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.