जळगाव (प्रतिनिधी) – १४ ऑगस्ट २०२१ रोजी औरंगाबाद येथे आयोजित २००किमी च्या BRM सायकलिंग च्या स्पर्धेत जळगांव येथील पॅथॉलॉजिस्ट डॉ अनघा सुयोग चोपडे यांनी सहभाग घेत ही स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली.
२०० किमी सायकलिंग स्पर्धा पूर्ण करण्यासाठी १३ तास ३० मिनिटांचा वेळ देण्यात आलेला होता. डॉ अनघा चोपडे यांनी ही स्पर्धा फक्त ९ तास २८ मिनिटांत पूर्ण केली. डॉ अनघा या जळगांव जिल्ह्यातील पहिल्याच डॉ आहेत ज्यांनी ही २००किमी ची स्पर्धा पूर्ण केलेली आहे.
२०० किमी सायकलिंग पूर्ण करण्याऱ्याला रॅन्होनियर म्हणतात. UK, ऑस्ट्रेलिया, ब्राझील या देशांत या स्पर्धेला आडाक्स म्हणूनही ओळखले जाते. या स्पर्धेत मिळविलेल्या यशासाठी जळगांव IMA चे अध्यक्ष डॉ सी.जी.चौधरी, सचिव डॉ राधेश्याम चौधरी, सहसचिव डॉ जितेंद्र कोल्हे, जनसंपर्क अधिकारी डॉ.दिलीप महाजन, राज्य IMA चे पदाधिकारी डॉ. अनिल पाटील, डॉ स्नेहल फेंगडे आणि इतर सर्व ऑफिस बियरर यांनी डॉ अनघा चोपडे यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.