उमेदवार वंदना इंगळे, रंजना वानखेडे, सुनील खडके यांना जनतेचा उदंड प्रतिसाद


जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १६ मध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आर.पी.आय. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराने जोर धरला आहे. सायंकाळी ५ वाजता आ. सुरेश दामु भोळे (राजुमामा) यांच्या प्रमुख उपस्थितीत अयोध्या नगर परिसरातून भव्य रॅली काढण्यात आली.
महायुतीच्या उमेदवार वंदना संतोष इंगळे, रंजना विजय वानखेडे आणि सुनील वामनराव खडके यांच्या प्रचारार्थ ही रॅली काढण्यात आली होती. रॅलीची सुरुवात मनुदेवी मंदिर, लीला पार्क येथून करण्यात आली. यावेळी आ. राजुमामा भोळे यांनी मतदारांशी थेट संवाद साधला. प्रभागातील विविध समस्या सोडवण्यासाठी आणि शहराच्या विकासासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.


सदर रॅली लीला पार्क, सोपानदेव नगर, हॅपी होम कॉलनी, जांगिड ब्राह्मण सभा, अशोक नगर (महादेव व दत्त मंदिर), शांती निकेतन सोसायटी, रायसोनी शाळा, हनुमान मंदिर (अयोध्या नगर), मिलिंद खडके निवासस्थान, साईबाबा मंदिर, सागर शॉपी, संतोष इंगळे निवासस्थान, रेमंड कॉलनी, गुरुकुल कॉलनी, अपना घर कॉलनी, सद्गुरु नगर, सिद्धी विनायक शाळा, हनुमान नगर, स्वामी समर्थ केंद्र, लक्ष्मी पार्क, बालाजी मंदिर, यमुना नगर आणि रामचंद्रनगर मार्गे काढण्यात आली. रॅलीचा समारोप पुन्हा मनुदेवी मंदिर येथे झाला.
याप्रसंगी प्रभाग १६ ‘ब’ च्या उमेदवार वंदना संतोष इंगळे, १६ ‘क’ च्या उमेदवार रंजना विजय वानखेडे आणि १६ ‘ड’ चे उमेदवार सुनील वामनराव खडके यांच्यासह भाजपचे अनेक दिग्गज पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये मंडळ अध्यक्ष विनोद मराठे, माजी नगरसेवक प्रदीप रोटे, सरचिटणीस किसन मराठे, प्रदेश कार्य सदस्य संतोष इंगळे, महानगर कोषाध्यक्ष विजय वानखेडे, माजी मंडळ अध्यक्ष सुनील सरोदे, अनिल चौधरी, हितेश खडके, योगेश डोळे, पूजा सरोदे आणि सामाजिक कार्यकर्ते बाळाभाऊ सोनवणे,संजय विसपुते, बबलू बाविस्कर, पियुष वानखेडे, हर्षल इंगळे यांचा समावेश होता.










