पुणे (वृत्तसंस्था ) ;– काही दिवसांपूर्वी बोपदेव घाटात झालेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली असून हे तिघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समजते .सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपीचा शोध पोलिसांनी घेतला . या प्रकरणी दोघांना नागपूर येथून तर एकाला पुण्यातून अटक करण्यात आली आहे.मित्रा सोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर तिघांनी कोयत्याचा धाक दाखवून व मित्राला जीवे मारण्याची धमकी देऊन आळीपाळीने बलात्कार केला होता. या घटनेमुळे पुण्यासह संपूर्ण राज्य हादरले होते.
बोपदेव घाटात झालेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणात पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतलं आहे. यातील दोघांवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी कोंढव्यातील राहणारे असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी 24 पथके तयार केली होती. त्याशिवाय, या प्रकरणातील आरोपींचे स्केच जारी करण्यात आले. आरोपींची माहिती देणाऱ्यांना बक्षीसही जाहीर करण्यात आले होते.
तब्बल ७ दिवसांपासून पुणे पोलिस आरोपींचा शोध घेत होते. या साठी आधुकीक तंत्रज्ञानाचा एआय सिंबाचा वापर पोलिसांनी केला. या सोबतच ३ हजार पेक्षा अधिक फोन कॉल तपासण्यात आले तर २०० पेक्षा अधिक आरोपींच्या चौकशी करण्यात आली. या सर्व प्रयत्नांनंतर पुणे पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. या घटनेतील एका संशयित आरोपीला पुण्यातून तर, दोघांना नागपुरातून अटक केली आहे.