धरणगाव तालुक्यातील पिंपळे फाटा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- पिंपळे फाटाजवळुन धरणगावकडे जात असताना भरधाव बोलेरो पिकअपने धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे जण जखमी झाले होते. एका जखमीची येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मुत्यूशी झुंज सुरू असताना १८ रोजी रात्री ८ वाजता त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी महिंद्रा बोलेरो चालकाविरुध्द बुधवार,२५ रोजी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
नवल सुरसींग भील (३५, रा.काझीपुरा, ता.चोपडा) असे मृताचे नाव आहे. नवल भील तसेच त्यांचा मित्र मंगल मुलचंद भील हे गुरुवार ५ रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास चोपडा धरणगाव रोडवर पिंपळे फाटाजवळून दुचाकी (क्रमांक एम.एच.१९ ए.ए.८५०८) ने धरणगाव येथे जात होते. त्यांच्या मागुन भरधाव बोलेरो पिकअप (क्रमांक एम.एच.१९ सी.के.१२४५) ने धडक दिली. या अपघातामध्ये नवल भील यांच्या डोक्याला आणि पोटाला जबर दुखापत झाली. प्राथमिक उपचाराअंती नवल भील याना जळगाव येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.
अतिदक्षता विभागात उपचार घेत असताना बुधवार १८ रोजी त्याची प्रकृती अत्यवस्थ झाली. उपचाराला प्रतिसाद देवू न शकल्याने रात्री ९.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविल्यानंतर जिल्हापेठ पोलिसांनी पंचनामा केला. या प्रकरणी बोलेरो चालकाविरुध्द धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हेड कॉन्सटेबल चंदूलाल सोनवणे हे करीत आहेत.