पारोळा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील बोळे येथे ४५ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीला आली. पारोळा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारोळा तालुक्यातील बोळे येथे ४५ वर्षीय महिला कुटुंबीयांसह राहतात. गावातील दिलीप पुंडलिक निकम हा १ ऑक्टोबररोजी रात्री महिलेच्या घरात अनधिकृतपणे घुसला व महिलेशी अंगलट करत तिचा विनयभंग केला. तिला मारहाण करून शिवीगाळ देखील केली जिवे ठार मारण्याची धमकी दिली. विवाहितेच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात दिलीप निकम याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर करीत आहे.