बोदवड ( प्रतिनिधी ) – बोदवड नगरपंचांयत निवडणुकीच्या चार जागांसाठी आज पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे .
बोदवड नगरपंचायतीच्या चार प्रभागांची निवडणूक ओबीसी आरक्षणाच्या न्यायालयाच्या निर्णयामुळे स्थगित करण्यात आली होती. उपविभागीय अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी रामसिंग सुलाने यांनी या चार प्रभागांचे निश्चित केलेले आरक्षण जाहीर करून निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता
त्यानुसार प्रभाग क्रमांक दोन मध्ये सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक तीन मध्ये सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक १५ मध्ये सर्वसाधारण व प्रभाग क्रमांक १७ मध्ये सर्वसाधारण महिला या प्रमाणे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. २९ डिसेंबर ते ३ जानेवारी २२ पर्यंत सकाळी ११ ते ३ या वेळेत नामनिर्देशनपत्र सादर करावयाचे आहेत. १ व २ जानेवारीला दोन दिवस सुट्टी असे असल्याने नामनिर्देशनपत्र स्विकारले जाणार नाहीत. तसेच नामनिर्देशन पत्रांची छाननी व मुख्य वैधरीत्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी ४ जानेवारीला प्रसिद्ध करण्यात येईल. माघारीसाठी अंतिम मुदत १० जानेवारी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया १८ जानेवारीला तर सर्व १७ जागाची मतमोजणी १९ जानेवारीला करून निकाल जाहीर केला जाणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आकाश डोईफोडे यांनी दिली.