बोदवड तालुक्यातील शेलवड येथील घटना
बोदवड (प्रतिनिधी) : एका पशुपालक तरुणाचा बकऱ्यांना पाला तोडण्यासाठी काढत असतांना तोल गेल्याने तलावात पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी समोर आली आहे. याप्रकरणी बोदवड पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दादाराव जगदेव बोदडे (वय ३८ रा. शेलवड ता.बोदवड) असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे. शेलवड गावात दादाराव बोदडे हा तरूण परिवारासह वास्तव्याला होता. मंगळवारी दि. २७ ऑगस्ट रोजी दुपारी दादाराव हा बकऱ्यांना चारा घेण्यासाठी गावातील भवानी माता मंदीराच्या जवळ असलेल्या तलावाजवळ गेले होते. त्यावेळी पाला तोडतांना त्याचा पाय घसरल्याने तो तलावात पडला व बुडून मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावातील ग्रामस्थांनी धाव घेवून त्याला बाहेर काढले व बोदवड रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत बोदवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहकॉ संतोष चौधरी हे करीत आहे.